मालक परदेशात असल्याचा फायदा घेऊन सदनिका विक्री करण्याच्या उद्देशाने बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी करुन फसवणूक, लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : मालक परदेशात गंभीर आजाराने आजारी असलेचा व ते भारतात लवकर परत येणार नाहीत याचा फायदा घेऊन सदनिका दुसरे कोणास तरी विक्री करणेचे उद्देशाने कदमवाकस्ती येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ येथे बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेहाना मोहंमद मोबीन शेख (वय ५०, रा. सध्या फ्लॅट नं. ४, बी बिल्डींग, कुमार गॅलेक्सी सोसायटी, ३८२/२ भवानी पेठ पुणे.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम शेख (रा. कोंढवा पुणे), इरफान खादरसाब नदाफ, नईम नजीर तांबोळी, ॲड. सईद नजीर शेख तसेच अनोळखी महीला व पुरुष यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या दुबई येथे वैदयकीय व्यवसाय करतात. त्यामुळे त्या पती मोहंमद मोबीन मुलगा रेहान व मुलगी मिराज यांचेसह दुबई येथे रहावयास आहेत. त्या पुणे येथे सध्या रहावयास असलेला कुमार गॅलेक्सी सोसायटी, भवानी पेठ पुणे येथील १२०० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट हा त्यांचे सासरे व सासु यांनी सन १९९६ साली कुमार बिल्डर यांचे कडुन खरेदी केला होता. सासरे नोव्हेंबर २०१० मध्ये मयत झाल्या नंतर सदर फ्लॅट वारसा हक्काने त्यांचे पती व सासुचे नावावर झाला होता. सन २०२० मध्ये सासु वयस्कर झालेने त्यांनी सदर फ्लॅटची पुर्ण मालकी फिर्यादीचे पती यांना बक्षीसपत्र करुन दिलेली होती.

दरम्यानचे कालावधीमध्ये पतीस ब्रेन स्ट्रोकचा आजार झालेला होता त्याकारणाने ते सतत आजारी असायचे त्यामुळे डिसेंबर २०२० मध्ये पतीने त्यांचे नावावर असलेला फ्लॅट दुय्यम निबंधक कार्यालय हवेली १० पुणे येथील दस्त क्रमांक २२०१७/२०२० अन्वये फिर्यादी यांच्या नावे बक्षीसपत्र केला होता. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पती मोहंमद मोबीन शेख यांना ब्रेन स्ट्रोक झालेने त्यांना उपचारासाठी बेंगलुरु येथील निमहँन्स हॉस्पीटल. या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी फिर्यादी यांना मोबाईलवर टेक्स्ट मेसेज प्राप्त झाला त्यामध्ये Dear Tax Payer, received your payment Rs.98023 agenst F/2/17/02781000. Thank You, Property Tax PMC असा मजकुर लिहलेला होता.

       

त्या दुबई येथे रहावयास व आजारी पतीचे उपचारामध्ये व्यस्त असल्याने त्यांनी भवानी पेठ पुणे येथील फ्लॅटचा पुणे महानगरपालिकेचा बरेच वर्षाचा मिळकत कर/टॅक्स भरलेला नव्हता पतीचे उपचारा मध्ये व्यस्त असलेने त्यांनी सदर मेसेजकडे दुर्लक्ष केले होते. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी त्यांना पुन्हा Dear Tax Payer, received your payment Rs.3510 agenst TITLE TRANSFER F/2/17/02781000.Thank You, Property Tax PMC असा मजकुर लिहलेला आणखी एक टेक्स्ट मॅसेज VM-PMCTAX-S या नंबर वरुन प्राप्त झाला. त्यावेळी तात्काळ त्यांनी पुणे येथील त्यांचे वकील हरीष कुंभार यांना फोन
करुन सदर दोन्ही मॅसेज बाबत कल्पना दिली व त्यांना त्याबाबत माहीती घेणे बाबत सांगीतले होते.

त्या पुणे येथे आलेनंतर फ्लॅटचा सर्च रिपोर्ट काढला असता त्याचे नव्याने रजिस्ट्रेशन झालेचे दिसुन आले व सदर कागदपत्रांवरुन सलीम शेख याने फिर्यादी व त्यांचे पतीचा फोटो वापरुन तसेच त्यांच्या जागी इतर कोणीतरी महीला व पुरुष यांना उभे करुन तसेच त्यांच्या बनावट सहया करुन, बनावट तलाक नामा तयार करुन फिर्यादी व त्यांचे पती यांना सदर फ्लॅट विक्रीचे तसेच इतर सर्व हक्क दिले बाबतचे बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करुन, त्यांना दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ येथे हजर ठेवुन साक्षीदार म्हणुन इरफान खादरसाब नदाफ व नईम नजीर तांबोळी यांनी त्यावर सहया करुन, ॲड. सईद नजीर शेख यांनी त्याकरीता ओळख दाखवुन सदरचा फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न झालेचे निदर्शनास आलेले आहे. त्यानंतर त्या लागलीच त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ येथील कार्यालयात जाऊन झालेल्या फसवणुकीबाबत माहीती दिली असता त्यांनी सदरचे हक्कसोड पत्र रद्द करणेची प्रक्रिया सुरु केलेली आहे.

त्या पुणे येथे आलेनंतर त्यांचे सोसायटीमध्ये रहावयास असलेले मनिष सोनीगरा हे सदरचा फ्लॅट मी विकत घेणार असलेबाबत व त्याबाबतचे रजिस्ट्रेशन सुध्दा झालेबाबत सोसायटीतील इतर लोकांना सांगत असले बाबत समजले होते. तसेच यापुर्वी मनिष याने त्यांना व्हॉटसअप वरुन एक इसम तुमचा फ्लॅट विक्री करणार आहे असे सांगुन एक फोटो पाठविलेला होता. त्याच फोटो मधील इसमाने नव्याने रजिस्ट्रेशन केलेचे कागदपत्रांवरुन दिसुन आले त्यावरुन फसवणुक झालेली असलेबाबत खात्री झाली होती. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!