प्लॉटच्या आमिषाने फसवणूक, ५ लाखांचा घातला गंडा, तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा…


लोणी काळभोर : बुकींग साठी ५ लाख रुपये टोकन घेऊन प्लॉट विक्री न करता व खरेदीखत करून न देता फसवणुक केले प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी काळूराम बाळासाहेब लवांडे (वय ३३, रा. प्लॅट नंबर एच ०१/१११, मांजरी ग्रीन वूड, शेवाळवाडी, पुणे सोलापूर रोड, शेवाळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतेज चंद्रशेखर पाषाणकर रा.धायरी, पुणे), राहुल लक्ष्मण सुतार व नितीन जगताप यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, लवांडे यांना राहण्यासाठी जागेची गरज होती. यांसाठी ते शोध घेत होते. ते ३ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणी काळभोर गावचे हद्दीतील गटनं.२/२, पाषाणकर बाग ता. हवेली) येथे आपल्या मामांसह आले त्यावेळी त्यांना जागा विक्रीचा फलक दिसला. म्हणून त्यांनी चौकशी केली असता त्यांना सदर जमीन पाषाणकर यांची असून त्यांनी ती सुतार व जगताप या एजंटांकडे जमिनीवर प्लॉटिंग करून प्लॉट विक्री करण्यासाठी दिली असल्याचे त्यांना समजले.

तेथील प्लॉट आवडले नंतर प्रती गुंठा १४ लाख भाव ठरला. टोकन म्हणून लवांडे यांनी कर्ज काढून ५ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांना ११ गुंठे गेल्यानंतर खरेदीखत केले जाईल असे सांगितले गेले. यानंतर ते दिड वर्ष थांबले. तरीही खरेदीखत होत नाही म्हणून त्यांनी तगादा लावला.

यादरम्यान पाषाणकर यांनी सदर जमीन विक्रीसाठी गणेश गायकवाड यांच्याकडे हस्तांतरित केली होती. यासंदर्भात त्यांनी पाषाणकर यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी जागेचे भाव वाढले असून सध्या प्रतीगुंठा २० लाख रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे तुम्हाला २० लाख रुपये द्यावे लागतील. किंवा तुम्ही दिलेल्या ५ लाख रुपयांचे १० लाख तुम्हाला मिळतील. असे त्यांना सांगण्यात आले.

काही दिवसांनी लवांडे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली असता त्यांना पाषाणकर यांनी तुमच्या टोकनच्या पावत्या बनावट असल्याचे सांगितले व पैसे देण्यास नकार दिला. व तुम्हाला काय करायचे ते करा पैसे किंवा जागा मिळणार नाही. असे म्हणून ते निघून गेले.

आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. तेथे बराच कालावधी गेला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या अर्जास खूप वेळ झालेने पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर यांचे परवानगी आणावी लागेल असे सांगितले गेले. त्यानुसार त्यांनी परवानगी आणलेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!