Fraud News : देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए. असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक, धक्कादायक माहिती आली समोर..


Fraud News : राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना घडल्याची समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पूर्ण माहिती अशी की, आपण देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए आहे, असे सांगत दोन जणांनी सोसायटीचे काम करून देण्याच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक केली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी दोघांची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील एका जणावर या पूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. Fraud News

दरम्यान, अशातच आता या दोघांवर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात १७०, ४१९, ४२०,३४ भा द वी कलमातर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फसवणुकीच्या घटनेत वाढ..

अलीकडे फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. फक्त सेलिब्रेटीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची देखील फसवणूक केली जात आहे. यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!