चार वर्षांची चमूकली शेंगदाणे खात होती, अचानक घशात शेंगदाणा अडकला अन् घडलं दुर्दैवी…


उत्तर प्रदेश : शेंगदाणे खाताना घशात शेंगदाणा अडकल्याने एका चार वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील रुनी गावात ही घटना घडली आहे.

मुलगी शेंगदाणे खात असताना तिच्या श्वास नलिकेत शेंगदाणा अडकल्याने तिला गुदरमल्यासारखे झाला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.

नेमकं घडलं काय?

रुनी गावात अनुज कठेरिया आणि त्यांची पत्नी रेनू घरात कामात व्यस्त होते. त्यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगी पलक तिच्या दोन लहान भावांसह विशेष ( ७ ) आणि सुर्यांश ( ६ ) यांच्या सोबत खेळत होती. त्यावेळी ते शेंगदाणे खात होते. ती नेहमीच शेंगदाणे खात असते.

त्यामुळे त्यांनी विशेष काही लक्ष दिले नाही. परंतू अचानक एक शेंगदाणा तिच्या गळ्यात अडकला,त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. सुरुवातीला तिच्या भावांना या धोक्याचा अंदाज आला नाही. काही वेळाने पलक बैचेन होऊन तडफडू लागली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली.

दरम्यान, त्यानंतर दोन्ही भाऊ रडू लागले. गोंधळ ऐकून तिचे वडील अनुज रुममध्ये आले. त्यांना पाठ थोपटवून शेंगदाना काढण्याचा प्रयत्न केला, परंतू काही यश आले नाही. पलक गुदमरुन बेशुद्ध झाली. कुटुंबियांतील लोकांना कळेना काय करावे.

त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!