बँकेत झालेत चार मोठे बदल, दंड होण्याआधी ‘हे’ नियम जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली : फेब्रवारी महिन्यातही बँकेच्या नियमात मोठे बदल झाले असून बँकेच्या बदलेल्या नियमाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. बँकेच्या नव्या ४ नियमांची माहिती नसेल तर दंड भरावा लागू शकतो. एटीएम ट्रांजेक्शन लिमिट ते बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे.
तसेचकाही बँकांनी बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एसबीआय खातेदारांना आता खात्यात कमीत कमी ५००० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. बँक खात्यात सुरुवातीला ३००० रुपयांची किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होते.
पंजाब नॅशनल बँक खात्याची किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून ३५०० रुपये केली आहे. कॅनरा बँकेच्या खात्यात किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून २५०० रुपये केली आहे. बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर खातेदारांना दंड भरावा लागणार आहे.
ठेवींवर शुल्क…
कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्याच्या नियमात बदल केले आहेत. १०००० रुपयांहून अधिक रोख ठेवींसाठी प्रति १००० रुपयांसाठी प्रति महिना ५ रुपये शुल्क लागू होणार आहे. एटीएम डिक्लाइन फी आता नॉन-कोटक एटीएमसाठी २५ रुपये लागू होईल. स्टँडिंग इंस्ट्रक्शन फेलिअर फी २०० रुपयांमध्ये घट करून १०० रुपये केली आहे.
एटीएम ट्रांजेक्शनची नवी मर्यादा..
फेब्रुवारी महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या अपडेटनुसार, मेट्रो शहरात एटीएमधारकांना महिन्यातून ३ वेळा एटीएममधून पैसे काढणे मोफत आहे. त्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येकी ट्रांजेक्शन मागे २५ रुपये आकारले जाणार आहेत. याआधी २० रुपये आकारले जात होते. तुम्ही दुसऱ्यांदा पैसे काढल्यास ३० रुपये शुल्क आकारले जातील. नॉन-मेट्रो शहरात मर्यादा ५ रुपयांची लागू आहे.
व्याजदरांवर ठेवा लक्ष…
रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे बँकेचे कर्ज स्वस्त होणार आहे. तसेच मुदत ठेवीवरील व्याजदरातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रेपो रेटच्या आधारावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते.
IDFC फर्स्ट क्रेडिट कार्ड..
२० फेब्रुवारीपासून आयडीएफसी फर्स्ट कार्डमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. स्टेटमेंटच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. CRED आणि PayTM सारख्या प्लॅटफॉर्मसाठी आता एज्युकेशन पेमेंटसाठी नवे शुल्क लागू होणार आहे. या व्यतिरिक्त कार्ड रिप्लेसमेंट फीमध्ये आता १९९ रुपये + कर भरावा लागणार आहे.