हडपसरचे चार मित्र फलटणला लग्नाला गेले, परतताना मात्र पोहण्याचा मोह आवरेना; निरा कालव्यात उतरताच तरुणाला काळाने घेरले…


बारामती : हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी आले होते. तेथून घऱी परत जाताना बारामती तालुक्यातील निंबुतजवळील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता, त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

हडपसर येथील भेकराईनगरमधील तुषार पोपट खेडकर (वय २१), गौरव गजानन भोसले, मंगेश कैलास शेळके आणि सूरज रामदास चौगुले हे मित्र दोन मोटारसायकलवरून फलटणला लग्नासाठी गेले होते.

लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता पुण्याकडे परतत असताना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निंबुत छपरी येथील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी सर्व मित्र पाण्यात उतरले.

पोहताना तुषार खेडकरचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढले आणि वाघळवाडी येथील साई सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेची निखिल रमेश कुन्हाडे (रा. भेकराईनगर, हडपसर) याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!