माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या ! आंतरराष्ट्रीय डॉनलॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय …!!


Mumbai : पूर्वाश्रमी काँग्रेस पक्षाचे व सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अजित पवार गटात प्रवेश केलेल्या माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचा मुंबईतील वांद्रे परिसरात गोळीबारात जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या

खून प्रकरणात हरियाणा व उत्तर प्रदेश मधील शार्प शूटरचा सहभाग उघड झाला असून दोघांना अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहे. या हल्यात आंतरराष्ट्रीय

कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हत्याकांडामागे सहभाग असल्याचे पोलिस तपासात धागेदोरे हाती लागत आहे.

 

छातीत दोन गोळ्या लागल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच तीन व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. मुंबईच्या वांद्रे पूर्व या भागातील खैरनगर परिसरात ही घटना घडली.

 

 

बाबा सिद्दिकी हे तीन वेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिले आहे. त्यांचा मुलगा दिशान हा वांद्रे पूर्व या भागाचा आमदार आहे.

 

चार वर्षांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्यावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर 2019 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. दत्त कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून सिद्दिकी ओळखले जात होते. 1999, 2004 व 2009 या काळात ते आमदार होते, तर आघाडी सरकारच्या वेळेस म्हणजे 2004 ते 2008 या दरम्यान ते राज्यात मंत्री देखील होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!