जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा..!!


उरुळीकांचन : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी गुरुवार (दि.११) दुसऱ्यांदा भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी वाघोली येथे प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेक्षाने शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघात एक ताकदवान नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश झालेले रामभाऊ दाभाडे यांनी २०२१ मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला होता. राष्ट्रवादी च्या फुटीनंतर त्यांनी दोन्ही गटाशी अलिप्त राहुन मध्यंतरी त्यांनी भाजपशी जुळवून घेतले होते. लोणीकंद येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापान निमित्त भेट दिली होती.

भाजप नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदिप कंद यांच्यासोबत त्यांनी राजकीय सक्रियता दाखविली होती. त्यानंतर त्यांनी आज वाघोली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने वाघोली गटात भाजपला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे.

या प्रवेश सोहळ्यासाठी भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप कंद , भाजप नेत्या आशाताई बुचके जिल्हा संपर्क नेते धर्मेंद्र खांडरे, भाजप हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे , शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!