सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, महाकुंभमेळ्यात घेतला अखेरचा श्वास..

सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाले आहे. कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती आहे.

महेश कोठे यांचे पार्थिव प्रयागराजहून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे. सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पराभवकेला होता.
महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत. नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती.सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे वयाच्या ५५ वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते.
सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला.
महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती. राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख आहे. सोलापूरमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.