खेडच्या माजी उपसभापतीने फ्लॉट धारकांना रस्ता अडवून मागितली खंडणी, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


खेड : खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती यांनी कुरुळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण ३४० नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व त्याचा भाऊ अनिल एकनाथ कांबळेयांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील(वय.३९वर्षे,रा.कुरुळी) असे तक्रारदारचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील(वय- 39 वर्षे,रा.कुरुळी) यांनी कुरुळी गावातील इंद्रायणी पार्क येथे स्वमालकीचा २०२३ मध्ये दोन गुंठे प्लॉट घेतला आहे. येथे तक्रारदाराबरोबर एकूण ३४० नागरिकांनीही इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे.

प्लॉटला पुणे-नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रीतसर करून घेण्यात आला आहे. प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकासक यांचा आणि आरोपी अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता. त्यानंतर तसाच करारनामा विकासक आणि प्लॉट धारक यांच्यात झाला आणि प्लॉटींगसाठी रस्ता देण्यात आला.

दरम्यान, रस्ता सुरळीत सुरु असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत. ती बांधकामे आम्हालाच द्यायचे इतर कुणाला द्यायचे नाही. अशी धमकी दिली. त्यामुळे अनेक प्लॉट धारकांनी अजूनही बांधकामे सुरु केली नाहीत.

परंतु याच प्लॉट मधील तब्बसुंम बी शेख साजिद पिंजारी रा.पिंपळे गुरव, राजेश बंकटराव जाधव, रा.मोशी, दिनेश रमेश काकुलते, प्रशांत काळडोखे यांनी बांधकाम सुरु केले असून त्यांनी बांधकाम अमर कांबळे यांना न देता प्लॉटधारकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दिले आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, कांबळे यांना प्लॉट न दिल्यामुळे याच गोष्टीचा मनात राग धरून सदर रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे. त्यानंतर अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक मोठया कंटेनरची केबिन मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवला. अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता जाता आम्ही बघतोच अशी धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, त्यानंतर अनेक वेळा सर्व प्लॉट धारकांनी अमर कांबळे व अनिल कांबळे यांना कंटेनरची केबिन रस्त्यातून काढण्याची विनंती केली. मात्र, तुम्ही जेंव्हाआम्हाला बांधकामे द्याल तेंव्हाच कंटेनरची केबिन काढू असे म्हणत खंडणीची मागणी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!