‘यशवंत’ चे माजी संचालक बापूसाहेब बोधे यांचे अल्पशा आजाराने निधन..


उरुळी कांचन : हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील माजी सरपंच बापूसाहेब यशवंत बोधे यांचे आज मंगळवारी (ता. 10) अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. शासन मान्यताप्राप्त ठेकेदार संतोष बोधे व महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बोधे सर यांचे ते वडील होत.

बापूसाहेब बोधे यांनी थेऊर येथील यशवंत कारखान्याचे व हवेली बाजार समितीचे संचालक पदावर काम केले होते. मागील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पती-पत्नी असे दोघेही सदस्य म्हणून निवडून आले होते. याच कालवधीत त्यांनी स्वतः सरपंचपद तर पत्नीने उपसरपंचपद भूषवले होते. तर कोरेगाव मूळ सोसायटीचे अध्यक्षपद ही भूषवले होते.

दरम्यान, बापूसाहेब बोधे यांच्यावर कोरेगाव मूळ येथील स्मशानभूमीत आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!