भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांची माऊलींच्या मंदिरास सदिच्छा भेट…
आळंदी : भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज (दि.३० जून) रोजी आपल्या कुटूंबियां समवेत माऊलीं मंदिरास सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी ,सिद्धेश्वर मंदिर,अजानवृक्ष,सुवर्ण पिंपळ यांचे दर्शन घेतले.व मंदिरातील ध्यान मंदिराला ही त्यांनी यावेळी भेट दिली.
यावेळी त्यांचा सन्मान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी शाल, श्रीफळ, श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन केला.यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मा.प्रमुख विश्वस्त डॉ.सारंग जोशी,सुभाष बोराटे, मनसुख लोढा, प्रसाद बोराटे, पोलीस अधिकारी रोहन गायकवाड, मच्छींद्र शेंडे, जालिंदर जाधव,स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक व इतर मान्यवर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
माऊलींच्या संजीवन समाधी दर्शना नंतर त्यांनी आळंदी येथील माजी विश्वस्त डॉ.सारंग जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.