जर न्यायपालिकाच देश पेटवत असतील तर…!! जेष्ठ वकीलाला रडू कोसळले, थेट म्हणाले, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संविधान आणि देशाला धोका पसरवलाय….

मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात महायुती सत्तेवर आली असून विरोधक ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत हे अनेकदा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर थेट टीका करताना दिसत आहेत.

असे असताना आता यामध्ये एका जेष्ठ वकिलानी उडी घेतली आहे. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. दुष्यंत दवे यांना देशभरातील परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले आहे. यामुळे त्यांनी नेमकं काय वक्तव्य केले आहे, हे महत्वाचे आहे. दवे यांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर मोठी टीका केली.
एका मुलाखतीमधून ते म्हणाले, सांप्रदायिकता आणि सामाजिक सौहार्द राखण्याची भूमिका असायला हवी. परंतु जिथे जिथे भाजप सरकार आहे, तिथे तिथे धार्मिक आग लावली जात आहे असा आरोप त्यांनी केला. यामुळे त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. दवे यांनी प्रार्थनास्थळ कायद्याचा संदर्भ दिला.

यामध्ये 1947 रोजी जी प्रार्थनास्थळे जशा अवस्थेत होती, तशीच ठेवण्याचा कायदा आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय काही उलटेच शैक्षणिक प्रयोग करत आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच ते म्हणाले, उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये धार्मिक हिंसाचारात चार निष्पाप लोकांचे जीव गेले. त्यासाठी न्यायपालिका जबाबदार नाही का? ज्या ठिकाणी भाजपचे राज्य आहे, तिथे धार्मिक हिंसाचारातून दोन समुदाय कायमचे विभागले जात आहेत, लोकांचे जीव जात आहेत, असेही ते म्हणाले.
यासाठी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशाला व संविधानाला मोठी धोका पोहोचवल्याचा आरोप दवे यांनी केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्वायत्त संस्था तसेच न्यायपालिका यावर सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यामुळे वातावरण तापले आहे.