मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड होणार लागू
Dress Code : राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शाळेत ड्रोस कोड लागू होणार आहे. त्यामुळे शाळेत आता शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सूचना दिल्या आहेत.
हा निर्णय लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनासारखे कोणतेही कपडे घालता येणार नाही. दरम्यान, शिक्षकांच्या कपड्याचा रंग कुठला असावा याबाबत शाळा निर्णय घेणार आहे. राज्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली आहे.
सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे घालावे लागणार आहेत. या नियमाप्रमाणे महिला शिक्षकांसाठी साडी किंवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा.
इतकेच नाही तर सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.