Floods in Assam and Manipur : आसाम, मणिपूरमध्ये पुराचा कहर! ४८ लोकांचा मृत्यू, हजारो बेघर, ७ दिवसांसाठी रेड अलर्ट…


Floods in Assam and Manipur : आसाम आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसानंतर मणिपूर आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. आसाम आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

भारतीय हवामान विभागने या आठवड्यात सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. लष्कर, आसाम रायफल्स, राज्य पोलीस, मणिपूर अग्निशमन सेवा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान आणि स्थानिक स्वयंसेवक पूरग्रस्तांना वाचवण्यात गुंतले आहेत. Floods in Assam and Manipur

अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.३) रोजी सांगितले की, दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे एकूण 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आसाममध्ये ४६ आणि मणिपूरमध्ये दोन मृत्यू झाले आहेत. आसाममध्ये बुधवारी पुराच्या पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला, तर मणिपूरमध्ये २९ जिल्ह्यांतील १६.२५ लाखांहून अधिक लोक पुराच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधित झाले आहेत.

दरम्यान, त्याच वेळी, मणिपूरमधील पूरग्रस्त भागातून २००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. १०५ महसुली मंडळांतर्गत २८०० गावे अजूनही पाण्यात बुडाली असून पुराच्या पाण्यात ३९४५१. ५२ हेक्टर पीक क्षेत्र बुडाले आहे.

आसाममध्ये, २४ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने स्थापन केलेल्या ५१५मदत शिबिरांमध्ये आणि वितरण केंद्रांमध्ये 3.86 लाखांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!