मोठी बातमी! आधी सरपंच आता आणखी एक संशयास्पद मृत्यू, बीडमध्ये खळबळ…


बीड : दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या केज तालुक्यातील मस्साजो येथील आवादा कंपनीच्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासह त्यांच्या साथीदारांची खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत

मिळालेल्या माहिती नुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला आहे. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला असल्याचे समोर आले आहे. सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.

केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!