मोठी बातमी! अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर, विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं अन्…,धक्कादायक माहिती आली पुढे


पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महिनाभरापासून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात नसून घातपात आहे, असा दावा त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार पुरावेच सादर केले होते.

यातून त्यांनी अनेक शंकाही निर्माण केल्या तसंच विमानात इंधनाचा अतिरिक्त साठाच होता, त्यामुळे विमानाचा भीषण स्फोट झाला, असाही दावा त्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

असे असतानाच आता डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत. या अहवालानुसार ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या अहवालानुसार अपघातादरम्यान विमान अगोदर झाडावर आदळले. त्यानंतर विमान जमिनीवर आदळले. पुढच्याच क्षणी विमानाचा मोठा अपघात झाला. समोर आलेला हा अहवाल 22 पानांचा आहे. अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला. या स्फोटानंतर उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाले असे या अहवालातातून समोर आले आहे.

याच अहवालात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याचा तात्पुरता निष्कर्ष काढण्यात आला आहे. अपघाताचे अंतिम कारण CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होणार आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताची काही संभाव्य कारणं या प्राथमिक अहवालात सांगण्यात आली आहेत. यामध्य VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक/दृश्य भ्रम , MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती. सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!