पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. अशातच आता सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे, मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांची यादी, मतदारसंघातील जनसंपर्क या सर्व बाबी तपासूनच उमेदवारी देण्यासाठी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
अशातच पुण्यात आम आदमी पार्टी देखील लढणार निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार असून आपकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर करण्यात आली आहे. आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महानगरपालिका २०२५-२६ निवडणूक अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. (

कोणत्या नेत्यांना दिली संधील?
१. सौ शितल कांडेलकर प्रभाग 3 (अ) ओबीसी महिला
२. श्री संतोष काळे: प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
३. सौ श्रद्धा शेट्टी :- प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
४. श्री शंकर थोरात: प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
५. श्री विकास चव्हाण: प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
६. अँन अनिस :- प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
७. श्री सुदर्शन जगदाळे :- प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
८. सौ आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
९. अँड. कृणाल घारे :- प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
१०. अँड. दत्तात्रय भांगे: प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
११. श्री समीर आरवडेः प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
१२. सौ मधू किरण कांबळे :- प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
१३. श्री उमेश बागडेः- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
१४. सौ विजया किरण कद्रे: प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
१५. श्री निरंजन अडागळे : प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
१६. श्री अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
१७ अँड अमोल काळे: प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
१८. श्री निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
१९. श्रीमती सुरेखा भोसले: प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
२०. श्री रमेश मते :- प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
२१. श्री धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
२२. श्री कुमार धोंगडे प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
२३. श्री गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
२४. सौ प्रिया निलेश कांबळे : प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
२५. श्री प्रशांत कांबळे : प्रभाग 38 (इ) सर्वसाधारण
