देशातील पहिली घटना ट्रान्सजेंडर पुरुष गरोदर…!

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या ठिकाणी एक पुरुष ट्रान्सजेंडर गरोदर असून सध्या या व्यक्तीला आठवा महिना सुरू आहे. महिला म्हणून जन्माला आलेला जिहाद शस्त्रक्रियेद्वारे पुरुष बनला होता. जिहाद आणि त्याची पार्टनर जिया ने या माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

जहाद एक महिला म्हणून जन्माला आली आणि नंतर ती पुरुष झाली. तर त्याचा पार्टनर जिया पावल एक डांसर आहे. ती पुरुष म्हणून जन्माला आली व एका महिलेत तिचे रुपांतर झाले. जहादने गरोदर होण्यासाठी स्वतःची ट्राझिशनिंग प्रोसेस बंद केली आहे. जहाद मुलाला जन्म दिल्यानंतर पुरुष बनण्याची प्रोसेस पुन्हा सुरू करेल. जहादने दोन्ही स्तन काढून टाकलेत. त्यामुळे ते बाळाला मेडिकल कॉलेजमध्ये मिळणारे ब्रेस्ट मिल्क बँकेतील दूध देणार आहेत.
या दाम्पत्याने आपण पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये एका मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळंत होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

या विषयी अधिक माहिती देताना जिया म्हणाली, ” आमचे आई वडील होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 8 महिन्यांचा गर्भ आता जहादच्या पोटात आहे. मी जन्माने किंवा आपल्या शरीराने केव्हाच एक महिला नव्हते. पण आपल्याला कुणीतरी आई म्हणावे असे माझे स्वप्न होते. आम्ही एकत्र येऊन 3 वर्षे झालेत. माझ्या आई बनण्यासह जहादचे वडील बनण्याचे स्वप्न आहे. आज 8 महिन्यांचे जीवन त्याच्या मर्जीने त्याच्या पोटात वाढत आहे.’
“आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही आमचे जीवन अन्य ट्रान्सजेंडर्सपेक्षा वेगळे असावे असा निश्चय केला. बहुतांश ट्रान्सजेंडर कपलचा समाज व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार करतात. या जगातील आपले अस्तित्व संपल्यानंतरही आपले कुणीतरी असावे यासाठी आम्हाला एक मूल हवे होते. आम्ही बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा, जहादची ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी सुरू होती. आम्ही ती गरोदरपणासाठी थांबवली,” अशी माहिती जियाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.