ब्रेकिंग! पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी पहिली कारवाई, बडा अधिकारी निलंबित, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, अजित पवार अडचणीत…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुण्यातील 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये
विकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या अजित पवार अडचणीत आले आहेत.

यामध्ये गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टँपड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत तहसिलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी हे आदेश दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर अजित पवार यांनी अजून कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र त्यांचे मौन सगळं काही सांगत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

       

दरम्यान, काल पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी  रुपयांत विकल्याचे प्रकरण उजेडात आले, या व्यवहारात स्टँप ड्युटीही
500 फक्त आकारण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर लगेच कारवाई करत तहसीलदार यांच्यावर कारवाई केली आहे.

दरम्यान, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत अनेकांनी आवाज उठवला असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या अडचणीत आले आहेत. याबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!