पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो माघितल्याचा कारणावरुन हवेत गोळीबार ! वाडेबोल्हाई येथील घटना….!

लोणीकंद : पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचा कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) रात्रीच्या वेळी श्रीक्षेत्रबोल्हाई वाडेगाव (ता. हवेली जि. पुणे) येथे घडली. याप्रकरणी अजित महादेव जाधव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर ओंकार अंकुश लांडगे (वय-25 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-29 वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचा कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करत दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याने त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो अजित याला मागितले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सदर वाद सोडवण्यासाठी गणेश याने दोन जणांना बोलावून घेतले. यानंतर अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दोघांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर ते फरार झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच लोणीकंद पोलिसांनी बारा तासांच्या तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. याबाबत अधिक तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत