ब्रेकिंग! सातारा-पाठणच्या मोरणा गावात गोळीबार, दोघांचा मृत्यू, 1 गंभीर…!
सातारा : सध्या सातारमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मोरणा गावात आज गोळीबार झाला. यामध्ये 2 जण ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघे जण ठार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले आहेत. हा गोळीबार पवनचक्कीच्या जुन्या व्यवहारातून झाल्याची चर्चा आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मदन कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. तर गोळीबारात ठार झालेला एक जण शंभूराजे देसाई यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.