धक्कादायक! पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार…

पुणे : पुण्यातील खडकवासलामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मौजमजेसाठी परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत चौकशी सुरू आहे. याबाबत अजून नावे समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आता परवाना आणि आरोपींची चौकशी करत आहेत. सध्या पुण्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जात आहे.
अनेक ठिकाणी कोयता गॅंग देखील लोकांना त्रास देऊन दहशद निर्माण करत आहेत.
Views:
[jp_post_view]