केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार, मुलाच्या पिस्तुलातून गोळी झाडल्याने एकाचा मृत्यू..
लखनऊ : केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज मतदारसंघाचे खासदार कौशल किशोर यांच्या लखनऊमधील घरी तरुणाची हत्या झाली आहे. विनय श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. विनय हा कौशल किशोर यांच्या मुलाचा मित्र होता.
ठाकूरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेगरिया गावात ही घटना घडली. विनय श्रीवास्तवची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. विनयच्या कुटुंबियांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.
पश्चिम लखनऊचे डीसीपी राहुल राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय श्रीवास्तवचा मृत्यू गोळी लागल्यानं झाला. त्याच्या डोक्यावर जखमेची खूण आहे. रात्री सहाजण आले होते. जेवण झालं. त्यानंतर विनयला गोळी लागली.
गोळी ज्या पिस्तुलातून सुटली, ते विकास किशोर यांच्या नावे आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पश्चिम लखनऊचे डीसीपी राहुल राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय श्रीवास्तवचा मृत्यू गोळी लागल्यानं झाला. त्याच्या डोक्यावर जखमेची खूण आहे. रात्री सहाजण आले होते. जेवण झाले.
त्यानंतर विनयला गोळी लागली. गोळी ज्या पिस्तुलातून सुटली, ते विकास किशोर यांच्या नावे आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.