Fire News : हॉटेलमध्ये भीषण अग्नितांडव, ६ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी…
Fire News : सध्या आगीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाटण्यात भीषण अग्नितांडव झाल्याची घटना घडली असून या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पाटणा स्टेशनच्या जवळ पाल हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली. त्यानंतर सिलिंडरचा ब्लास्ट झाला. दोन जणांचा मृत्यू घटनास्थळी झाला होता. तर चार लोकांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.
या घटनेनंतर तातडीने फायर ब्रिगेडच्या टीमला बोलावण्यात आले. पण त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले.धक्कादायक बाब म्हणजे जोरदार वारं सुटले असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते. आजूबाजूच्या परिसरात आग पसरु नये यासाठी विद्युत पुरवठा खंडीत केला होता. Fire News
दरम्यान, अनेक गाड्यांची आग विझवण्यासाठी खूप वेळ लागला. हॉटेलमध्ये लागलेल्या आगीनंतर ४५ लोकांना रेस्क्यू करत सुखरुप बाहेर काढलं आहे तर ३८ लोकांवर उपचार सुरु आहेत.