Fire News : धक्कादायक! लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा लागला ढीग…


Fire News : उत्तर इराकच्या निनवेह प्रांतात एका लग्न समारंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील अल-हमदानिया जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या हॉलमध्ये आग लागल्यामुळे तब्बल १०० जणांचा बळी गेला आहे. तर १५० हून अधिक लोक जखमी आहेत. Fire News

जखमींपैकी काही जणांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निनेवेह प्रांत हा इराकची राजधानी बगदादच्या वायव्येस ३३५ किलोमीटर दूर आहे. तर मोसुलपासून जवळ आहे.

इराकी वृत्तसंस्था नीनाने दिलेल्या वृत्तानुसार या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये वधू आणि वराचाही समावेश आहे. दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रथमदर्शनी ही आग फटाक्यांमुळे लागली असावी अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया भागात एक लग्न सोहळा होता. हा सोहळा सुरू असतांना अचानक आग लागली. आगीमुळे वऱ्हाडी सैरावैरा पळू लागले. काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केले.

यात १०० जण जळून ठार झाले. तर १५० जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. इराकी वृत्तसंस्था नीनाने या आगीचे फोटो देखील शेअर केले आहे. यात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!