Fire News : मोठी बातमी! धावत्या शिवशाही बसला भीषण आग, पुर्णपणे बस जळून खाक..
Fire News : बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. Fire News
लातूरहून प्रवाशी घेऊन परळी मार्गे परभणीकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचं कळताच चालकाने सतर्कता दाखवत बस थांबवली.
बसच्या चालकाला आग लागल्याचे समजतात चालकाने सतर्कता दाखवत बस थांबवली त्यानंतर बसमधील प्रवाशांना लगेचच बाहेर काढण्यात आले. Fire News
यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बस जुळून संपूर्ण खाक झाली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
दरम्यान, धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे.
हा थरारक प्रकार परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.