Fire News : फटाका मार्केटमध्ये अचानक आग, काही क्षणातच २६ दुकाने पेटली, १२ जण होरपळले…

Fire News : उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेल्या फटाका स्टाॅल्सना काल (ता. १२) दुपारी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४ जण गंभीर तर १५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मथुरा शहरातील गोपाळबाग या ठिकाणी एका फटाक्याच्या दुकानात अचानक रॉकेट शिरलं अन् बघता-बघता २६ दुकानं पेटली.
या ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे तेथे फटाके खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडाली. ही आग एवढी भीषण होती, की घटनेमध्ये १२ जण होरपळले. Fire News
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितले आहे.
या आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र फटाक्यांचं अख्ख मार्केट जळून खाक झालं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.