पुण्यात अग्नितांडव! धावत्या बसला अचानक आग, मोठा अनर्थ….


पुणे : पुण्यात नगर-पुणे महामार्गावर धावत्या बसला अचानक आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅटरी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चालकाच्या प्रसंगावधानामुळे १५ ते २० कर्मचारी सुखरूप वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मौजे कोरेगाव भीमा येथे एक खाजगी बस रांजणगाव वरून पुण्याच्या दिशेने निघाली. दरम्यान ही बस नगर पुणे हायवे वरून जात असताना या बसमध्ये असलेल्या बॅटरीचे शॉर्टसर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घ्यायला सुरुवात केली. धावत्या बसने पेट घ्यायला सुरुवात केल्यानंतर बस चालकाच्या ही गोष्ट निदर्शनास आल्याने त्याने बस बाजूला लावली.ही बस एका खाजगी कंपनीची असल्याने या बसमधून कंपनीचे १५ ते २० कर्मचारी प्रवासी प्रवास करत होते. वाहन चालकाने प्रसंगावधता राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित हानी टळली.

दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत भडका उडालेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान धावत्या गाडीला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सदर घटनेत वाहन चालकाच्या तत्परतेमुळे मोठी जीवित हानी टळली असून बस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!