बँकेतील कामे उरकून घ्या..! मे महिन्यात ‘एवढ्या’ दिवस बँका राहणार बंद
पुणे : RBI ने एक मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात मे 2023 मध्ये देशातील बँका तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे तुमचे देखील काही काम बँकेत असेल तर तुम्ही ते पटकन करू घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
RBI च्या म्हणण्यानुसार मे 2023 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. मात्र, या 12 सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे 1 मेची सुट्टी फक्त महाराष्ट्रातच राहणार आहे. उर्वरित देशातील बँका नेहमीप्रमाणे सुरू होतील. अशा अनेक सुट्ट्या आहेत.
ज्यांचा केवळ प्रादेशिक आधारावर समावेश करण्यात आला आहे. मे 2023 मध्ये फक्त 12 दिवस आहेत जेव्हा अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शनिवार व रविवारसह बँकांच्या सुट्ट्यांमुळे बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मे 2023 मध्ये एकूण सुट्ट्यांची संख्या देखील 12 निश्चित करण्यात आली आहे.