ज्या बोटांनी नरेंद्र मोदींना मतदान केले तीच बोटे छाटली, धक्कादायक कारणाने राजकारणात उडाली खळबळ…

ठाणे : सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या बोटांनी मतदान केले तीच बोटे छाटली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली होती. या आत्महत्येला अंबरनाथेचे आमदार बालाणी किणीकर यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती.
आता न्यायासाठी नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या हाताचे एक बोट कापून राज्य सरकारला पाठवले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मी माझ्या शरीराचा एक एक अवयव कापून सरकारला पाठवत राहणार असे त्यांनी सांगितले आहे.

ज्या बोटांनी नरेंद्र मोदींना मतदान केले तीच बोटे छाटली, याबाबत त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यांच्या या भूमिकेवरून अनेकांना धक्का बसला आहे. यामुळे आता सरकार आता कारवाई करणार का.? हे लवकरच समजेल.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी आता कारवाई सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये बडे नेते देखील असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कोणती नावे समोर येणार लवकरच समजेल.