सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, आता सर्वांना हक्काचे घर मिळणार…


नवी दिल्ली : मोदी सरकार ३.० चा पहिला पूर्णवेळ सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

तसेच २०२५ मध्ये तब्बल ४० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे यावर्षामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय काय मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशामध्ये निर्मला सितारामन यांनी घरांबाबत मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा लागोपाठ आठवा अर्थसंकल्प आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी आहे.

त्यानंतर ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दोन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!