ब्रेकिंग! अखेर सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक, पुणे येथे सीआयडी पथकाची कारवाई, आता धनंजय मुंडे अडचणीत येणार?


पुणे : काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये अनेकांची नावे समोर येत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या सगळ्या घडामोडीत फरार असलेल्या वाल्मिक कराडला पुण्यातून अटक करण्यात आली. सीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे १०० हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे.

वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या महिलेची रविवारी सकाळपासून चौकशी केल्याची माहिती आहे. सीआयडीने या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिकी कराडही लपला आहे. सीआयडीने त्याचे बँक खाते गोठवले असून त्याच्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!