अखेर ठाकरे बंधूंच ठरलं! जागा वाटपाचा तिढा सुटला, मशालच वरचढ, रेल्वे इंजिन किती जागांवर लढणार?

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आता दोन्ही पक्षांच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याविषयी माहिती दिली.पुण्यात शिवसेना ठाकरे गट 91 जागा तर मनसे 74 जागा लढणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली असून पुण्यात मोठा भाऊ कोण? अशी चर्चा सुरू असताना मनसे आणि उबाठाचा फॉर्म्युला ठरला आहे. पुण्यात दोन्ही पक्षांच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेना ठाकरे गट 91 जागा तर मनसे 74 जागा लढणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहे.

मनसे आणि शिवसेनेचा निर्णय मराठी माणसांसाठी महत्त्वाचा आहे. 2017 मध्ये शिवसेनेने जवळजवळ 130 -135 जागेवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मला वाटतं की 70 टक्के जागा या शिवसेनेकडे असतील, असं ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे म्हणाले होते. मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने 70 टक्के जागा लढवल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे, असंही मोरे म्हणाले होते.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा दोन्ही पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितच लढणार असल्याचं हेमंत संभूस यांनी जाहीर केलं आहे. तर दोन्ही पक्षाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसात अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे.
