अखेर पत्र निघालं! ग्रामविकास विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश, नव्या अध्यक्ष -उपाध्यक्षांची 20 मार्चपूर्वी निवड होणार..


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका पार पडल्या तरी अद्यापही नव्या सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला नव्हता.आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी येत्या 20 मार्चपूर्वी करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या आदेशामुळे पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदा तसेच पंचायत समितीची पहिली बैठक 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित करावी असे ग्रामविकास विभागाने पुणे,सोलापूर, सातारा,सांगली,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, लातूर व परभणी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवल आहे.

दरम्यान या बारा जिल्हा परिषदा आणि या सर्व जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील एकूण 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आता ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार आता जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती- उपसभापतींच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मागील कार्यकारी मंडळाची मुदत ही 20 मार्च 2022 रोजी तर, पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या कार्यकारी मंडळाची मुदत ही 13 मार्च 2022 रोजीच संपली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक ही येत्या 20 मार्च, 2026 पूर्वी आयोजित करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!