अखेर महायुतीतील पेच सुटला ;महापालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा, रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

पुणे:राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा केली आहे.मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महापालिकेत महायुती म्हणून लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात युती करण्यावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीत कसं सामोरे जायचं याबद्दल चर्चा झाली. महायुतीमध्ये निवडणुका लढवण्यामध्ये वरिष्ठांमध्ये चर्चा झाली आहे. महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबतही चर्चा करण्यात येईल असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे सारख्या महापालिकेत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबत एक समिती तयार होईल, त्यात चर्चा होईल. स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. दोन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून महापालिकांमध्ये प्रमुख पदाधिकारी यांच्या कमिटी तयार करून चाचपणी करण्यासाठी व सकारात्मक पुढे जाण्याचा विचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.