बंडखोर सत्यजीत तांबे यांचे अखेर निलंबन…!


नाशिक: नाशिक पदवीधर विधानपरीषद निवडणुकीत बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे युवानेते अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेले यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांचे निलंबन करत असल्याचे सांगितले. तांबे परिवाराचे काय झाले याच्याशी आम्हाला आता काही भाष्य करायचे नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे. थोरात साहेब आमचे नेते आहेत. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करू. त्यांची काय भूमिका आहे ते पाहू. मात्र सध्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे असे नाना पटोले म्हणाले.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अधिकृतपणे शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. तर, दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!