अखेर राहुल गांधीमुळे माणिकराव कोकाटेंची जेलवारी टळली? दाखला आणि संदर्भ…. कोर्टात नेमकं काय घडलं?

पुणे:नाशिकमधील १९९५ च्या सदनिका वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगिती याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा देत त्यांची अटक टळली असल्याची माहिती समोर आली आहे.कोर्टात या प्रकरणातील युक्तिवादात कोकाटे यांच्या वकिलांनी राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर दिला.

काय घडलं कोर्टात?

माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोर्टात सुरुवातीची पार्श्वभूमी मांडली. त्यांनी जुन्या आदेशात साक्षीदार असणाऱ्या पोलीस पाटील यांच्या स्टेटमेंटचे दाखले दिले. जुन्या आदेशात कोकाटे यांचे 1990 ची आर्थिक परिस्थिती आणि पुढच्या काही वर्षात बदलेले आर्थिक परिस्थिती याचे संदर्भ देण्यात आले. आर्थिक परिस्थिती तशीच राहते का असा युक्तिवाद देखील करण्यात आला.

दरम्यान प्रकरणातील युक्तीवादादरम्यान वकिलांनी कोर्टात राहुल गांधीच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर दिला. शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी केली. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेला रिपोर्ट कोर्टात मांडण्यात आला. कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांचा मेडिकल रिपोर्ट मांडला. आयसीयूच्या बेड नंबर 9 मध्ये एडमिट आहेत माणिकराव कोकाटे असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान कोकाटे यांची होणारी एंजिओप्लास्टी याचा डॉक्टरांचा कोर्टात अहवाल देखील देण्यात आला. खासदार अफजल अन्सारी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय याआधी झाला होता त्याचा दाखला कोकाटे यांच्या वकिलानी कोर्टासमोर दिला. अफजल अन्सारी यांच्या 4 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्यामुळे कोकाटे वाचले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
