मोठी बातमी! अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी, फडणवीसांची मोठी घोषणा, २ लाखापर्यंत मिळणार लाभ…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार आता ज्या शेतकऱ्यांचा दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ.

समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहेत. समितीच्या शिफारशी आणि निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.