अखेर ठरलं! महादेवी लवकरच कोल्हापूरात परतणार, वनताराच्या CEO ने दिली महत्वाची माहिती….

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेली नांदणी येथील आपल्या सर्वांची लाडकी हत्तीण माधुरी आता पुन्हा आपल्या घरी परत येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, माधुरीला वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय शासनाचा नव्हता, तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झाला होता.
असे असताना मात्र, जनभावनेचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत माधुरीला परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या प्रेमामुळे आणि प्रयत्नांमुळेच माधुरी पुन्हा आपल्या नंदणी गावात येणार आहे. अनेकांनी याबाबत आंदोलन केले आहे.
यासाठी आनंद अंबानी व वनताराची सर्व टीम त्यांनी इतके दिवस महादेवाची काळजी घेतली याबद्दल त्यांचे आभार. तसेच तमाम जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे देखील आभार, अशी पोस्ट खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेटा ही संस्था आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे.
महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत त्यांची सध्या काय परिस्थती आहे याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती २०२३ साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत आज तो हत्ती तिथे आहे कि नाही याबाबत संशय निर्माण झालेला आहे. असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.