…अखेर 8 वर्षांनंतर छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, कोर्टाने दिला महत्वाचा निकाल
बारामती : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सन 2023- 2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक यांनी दिला. यामुळे आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील तीन वर्षांपासून लांबलेल्या कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. हा कारखाना सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उच्च न्यायालयाने श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक चार आठवड्यांत घेण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश कारखान्याला दिला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक चार आठवड्यांत घेण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश कारखान्याला दिला आहे.