वाघोलीत पान टपरीजवळ गुटख्याच्या पुडीवरून राडा; एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल

पुणे : तिला काही दिवसापासून शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना घडत असताना वाघोलीतील केसनंद रोडवरील जय मल्हार पान टपरीजवळ गुठक्याच्या पुडीवरून जोरदार राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी विक्रेता आणि ग्राहकाने परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.त्यानुसार दोघांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद येथील तळेरानवाडी परिसरात राहणारे देवराम हरगुडे (वय ४५) आणि राजाराम माने (वय ५८) यांच्यात पानटपरीवर गुटखा पुडीवरून वाद झाला.ही घटना २२ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास घडली. देवराम हरगुडे पान टपरी जवळ आल्यावर त्यांनी पुडी मागितली असता ती खराब असल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.त्यानंतर माने यांनी शिवीगाळ करून त्यांना ढकलले आणि टपरीतील दांडक्याने मारहाण केली तसेच माने यांच्या दोन नातेवाईकांनीही हरगुडे यांना मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान तक्रारीत राजाराम माने यांनी असे सांगितले की, ते टपरी बंद करून घरी निघाले असता हरगुडे यांनी त्यांना थांबवले. गुठक्याची पुडी मागितली असता खराब असल्याचे कारण सांगून हरगुडे यांनी जोरात बोलून माने यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावरून दोघांच्या मध्ये जोरदार वाद झाला.या घटनेत दोघेही जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंचा तपास सुरू केला आहे.
