शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानातील सुरक्षारक्षक आणि भक्तांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ वायरल…!
अहमदनगर : कोरोनानंतर शिर्डीचे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. दरम्यान या ठिकाणाहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
रामनवमीदिवशी शिर्डी येथील सुरक्षा रक्षक आणि साईभक्तांमध्ये तुफान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मंदीरात राहिलेले बॅग आणण्यासाठी भक्तांने आत जाण्यासाठी रक्षाकांसोबत वाद घातला. साई भक्ताला प्रवेश नाकारण्यात आल्याने सुरक्षारक्षकात तसेच साई भक्तात सुरवातीला बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी पोलीसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर भक्तांनी दर्शन घेताना नियम व्यवस्थित पाळले पाहिजेत. तसेच सुरक्षा रक्षकांनी देखील अशा प्रसंगी कायदा हातात न घेता याबाबत पोलिसांना माहिती दिली पाहिजे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.