आप आणि भाजप नेत्यामध्ये दिल्ली महापालिकेतच हाणामारी ! व्हिडिओ वायरल..!

दिल्ली : दिल्ली महापालिकेमध्ये मोठा राडा झाला आहे. या भांडणात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांनी एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. निकालानंतर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकामध्ये शाब्दीक युद्ध रंगले होते.
दरम्यान,आरोप-प्रत्योरोप करताना बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की आम आदमी पार्टीच्या एका नगरसेवकाने भाजपचे नगरसेवक प्रमोद गुप्ता यांच्या कानाखाली मारली. यावरून दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

Views:
[jp_post_view]