उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी राधाकृष्णन विरुद्ध बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत ; फडणवीसांनी हाती घेतली सूत्र


पुणे: उपराष्ट्रपती पदासाठी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आपापल्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भातील एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, फडणवीसांनी याआधीही मविआच्या नेत्यांना या निवडणुकीत सी. पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले होतं.त्यामुळे आता फडणवीसांच्या विनंतीनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (ता.21) शेवटचा दिवस आहे. तर 9 सप्टेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!