वेणुगोपाल स्वामी मंदिराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग…!
हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील वेणुगोपाल स्वामी मंदिराला भीषण आग लागली आहे. पश्चिम गोदावरी येथील वेणुगोपाल स्वामी मंदिराला रामनवमी उत्सवादरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे.
वेणुगोपाल मंदिर परिसरात रामनवमीसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपामध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. भाविकांना वेळीच मंदिरातून बाहेर काढण्यात आले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
Views:
[jp_post_view]