Fertilizer Prices : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट..


Fertilizer Prices : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्र सरकारने खतांच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शुभारंभ झाला.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Fertilizer Prices

यंदाच्या रब्बी हंगामाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी २२,३०३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत हे अनुदान सुरू असणार आहे.

यामध्ये नायट्रोजनसाठी ४२.२ रुपये प्रति किलो, फॉस्फरससाठी २०. ८२ रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी २.३८ रुपये प्रति किलो, सल्फरसाठी १.८९ रुपये प्रति किलो अनुदान मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर घेण्यात आलेले निर्णय. .

युरियाच्या दरात वाढ केली जाणार नाही.
रब्बी हंगामासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दिले जाणार.

खतांच्या किमतींवरील अनुदान कायम राहील.
एनबीएस अंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत खते मिळणार.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!