महिला पोलिस उपनिरीक्षक ५० हजाराच्या लाच प्रकरणी जाळ्यात, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई


मुंबई :  ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजाराची लाच घेणार्‍या महिला पोलिस उप निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

महिला पीएसआयच्या विरूध्द उरण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. तक्रारदार यांच्या वडिलांविरूध्द गुन्हा दाखल आहे

गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता पीएसआय सिंधु मुंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरूवातीला ६० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड करून ५० हजार रूपयाचे घेण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. पीएसआय सिंधु मुंडे यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रूपये घेतले.

त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द उरण पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!