महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ; मृत्यूनंतरही तरुणीच व्हाट्सअप ऍक्टिव्ह, मोबाईल नेमका कोणी वापरला?


सातारा: साताऱ्यातील फलटण येथे कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतरही मोबाईल अनलॉक करण्यासाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर केला गेला आहे.मृत्यूनंतर बराच वेळ त्या व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन दाखवत होत्या. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटच्या लास्ट सीन स्टेटसवरुन असे स्पष्ट होतं आहे. महिला डॉक्टरने रात्री दीड वाजता आत्महत्या केल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे. मात्र, रात्री दीडनंतर पुढे कित्येक तास महिला डॉक्टरचा मोबाईल वापरला जात होता. त्यामुळे आता मुंडेंच्या आत्महत्येनंतर त्यांचा मोबाईल नेमका कोण वापरत होत?हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

फलटणच्या उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक दिवसांपासून संपदा मुंडे या कार्यरत होत्या. विशेष म्हणजे त्या अत्यंत मेहनती असून 24 तास ड्यूटी करून पुढचे 24 तास ऑफ घेऊन अभ्यास करत. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक नोट हातावर लिहिली. त्यामध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला असून पीएसआयने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट म्हटले.

       

मुंडे यांच्या आत्महत्येनंतर याची सखोल चौकशी होत असून त्यांचे मृत्यूनंतरही सोशल मेसेजिंग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह होते. त्यामुळे कोणीतरी अ‍ॅप वापरल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. एसआयटीची स्थापना करून सर्व संशयित आरोपींचे सीडीआर काढण्याची मागणी केली जात आहे. महिला डॉक्टरवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. फलटण शहरात किरायाची रूम असताना देखील महिला डॉक्टरने दोन दिवसांसाठी हॉटेल बूक केल्याने मोठा संशय व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात आणखीन काय माहिती पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!