डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण ; डॉक्टरांची अवस्था प्रचंड घाबरलेली…, ‘त्या ‘संध्याकाळी हॉटेलमध्ये काय घडलं?


सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे नोकरी करत असलेल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.या प्रकरणात डॉक्टर महिला ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या हॉटेल मधुदीपचे मालक दिलीप भोसले यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर प्रचंड घाबरलेल्या परिस्थित होत्या आणि त्याची गाडी देखील व्यवस्थित पार्क केलेली नव्हाती, त्यांना गाडी पार्क देखील करता आली नाही शिवाय ही हत्या नसून आत्महत्याच आहे,असं देखील दिलीप भोसले यांनी म्हटल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिलीप भोसले यांनी 23 ऑक्टोरबर रोजी घडलेला क्रम सांगितला. ‘डॉक्टर महिला यांनी 2 दिवसांसाठी हॉटेलमध्ये खोली बूक केली होती. 23 ऑक्टोबर रोजी त्या मध्यरात्री रात्री दीड वाजता रुमवर आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन करण्यात आला, तोपर्यंत त्या ठिक होत्या. पण संध्याकाळी 5 वाजेनंतर त्यांच्या रुममधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.’
‘त्यांनी दार उघडला नाही तेव्हा संशय आला आणि रुमचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा कळलं की, त्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं… आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केलं आहे,असं देखील दिलीप भोसले म्हणाले.

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देखील फुटेल मालकांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले,‘हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर घाबरलेल्या परिस्थितीत होत्या. तेव्हा त्या एकट्याच होत्या की त्यांच्यासोबत इतर कोणी होत याचा तपास सध्या सुरु आहे. त्यांना स्वतःची गाडी देखील व्यवस्थित पार्क करता आली नव्हती. अशात हॉटेलच्या वॉचमॅनने त्यांची गाडी नीट लावली,असं देखील दिलीप भोसले म्हणाले.पोलीस डॉक्टर महिला आत्महत्ये प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!